अहमदनगर बातम्या

अहमदनगर : ‘शुभमंगल’ होण्याआधीच पोलीस ‘सावधान’ ! नवरानवरी बोहोल्यावर चढणार तितक्याच पोलिसांची एंट्री, अन पुढे..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दोघेही नटून थटून तयार, साखरपुड्याच्या नावाखाली सगळे जमलेले, पण होता लग्नाचा थाट, आता शुभमंगल करायचं इतक्यात पोलिसांची एंट्री..

थोड्यावेळ शांतता..अन उधळला गेला बालविवाहाचा डाव..अशा दोन वेगेगळ्या घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि कोपरगात तालुक्यात काल सोमवारी घडल्या आहेत.

सोमवारी कर्जत तालुक्यातील १७, तर कोपरगाव तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती स्नेहालयाच्या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावरून मिळाली होती. माहिती मिळताच सगळी सूत्रे हलली.

कोपरगाव व कर्जत पोलिसाना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठले. यातील पहिल्या घटनेत पोलिसांचे पथक कर्जत तालुक्यातील विवाहस्थळी गेले.

मंडपात विवाहपूर्वीचा विधी सुरु होता.पोलिसांनी मुलीच्या लग्नाबाबत नातेवाईकांकडे विचारणा केली असता आता साखरपुडा आहे नंतर लग्न होणार आहे अशी माहिती पोलिसांना देण्यात आली.

परंतु मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी मुलीला बोलावून घेत वय विचारले असता १७ वर्षे आणि ८ महिने असल्याचे समोर आले.

पोलिसी खाक्या दाखविताच नातेवाईकांनी हा साखरपुडा नसून लग्नच असल्याचे कबूल केले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत बालविवाह यांबविला.

दरम्यान यावेळी पोलिसांनी मंगलकार्यालयाचे मालक, डीजे चालक तसेच नातेवाईक यांना यापुढे अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यासाठी मदत केल्यास भेट कायदेशीर कारवाई करू अशीच तंबी दिली.

पोलिसांच्या सतर्कतेने व तत्परतेने दोन बालविवाह रोखण्यात यश आले.

हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग : आजीचा खून करणाऱ्या बापाला पोटच्या पोरानेच संपविले ! आईनेच दिली मुलाविरोधात फिर्याद

Ahmednagarlive24 Office