Ahmednagar Politics : राज्यात सत्ता असताना व राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली असताना कामे करण्यात मात्र ते अपयशी ठरले.
आमचे सरकार असल्याने आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि तनपुरे फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचे काम करतात, अशी टीका करत ५३ वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी आज शेतकऱ्यांना पाहायला मिळाले.
हा आयुष्यातील सुवर्ण क्षण असल्याची भावना जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली.राहुरी तालुक्यातील निभेरे कानडगाव परिसरात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले निळवंडे धरण कालव्यांचे पाणी वाहू लागले.
या पाण्याचे जलपूजन कर्डिले व धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कर्डिले म्हणाले, की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आम्ही वन खात्याची परवानगी मिळवली.
याची फ्लेक्स लावून श्रेय घेणाऱ्यांना कोणतीही माहिती नाही. त्यांनी कार्यक्रम करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. मामाशिवाय कोणतेही भांडवल त्यांच्याकडे नाही.
युती सरकारच्या काळात या कामी निधी उपलब्ध केला होता. त्यावेळी अकोले येथे काम करण्यास अडचण होती, म्हणून टेल टू हेड काम सुरू केले.
राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर हे काम अखेर पूर्ण झाले. पाणी जात असताना परिसरातील सर्व ओढे-नाले भरून दिले जातील, अशी ग्वाही दिली.
धनश्रीताई विखे पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आज आनंद पहायला मिळाला याचे समाधान वाटते. ५३ वर्ष संघर्ष करावा लागला; परंतु लवकरच हा भाग आता सुजलाम सुफलाम होईल.
माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी प्रास्तविक केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, युवा तालुका अध्यक्ष धिरज पानसंबळ, शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके,
युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, सोपानराव गागरे, कारखाना संचालक रवींद्र म्हसे, मधुकर गागरे, कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, माजी सभापती भिमराज हारदे,
सोपान गागरे, संदीप घाडगे, शांताराम सिनारे, उमेश शेळके, आण्णासाहेब बलमे, बाबासाहेब गाढे, गणेश ओहोळ, मारुती नालकर, किरण कोळसे,
संदीप गिते, डॉ. बापूसाहेब मुसमाडे, विलास मुसमाडे, लक्ष्मण ढगे, उत्तम मुसमाडे, बबन कोळसे, वसंत डुक्रे, सुभाष अंत्रे, विशाल लोंढे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, उपअभियंता प्रमोद माने,
नाना महाराज गागरे, ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ गागरे, आण्णा महाराज गागरे, विष्णू सिनारे, मनोहर महाराज सिनारे, बाळकृष्ण हारदे, सरपंच निशाताई गागरे,
विकास कोबरणे, साहेबराव कोबरणे, पोपट कोबरणे, राजू कोबरणे, मच्छिद्र कोळसे यांच्यासह लाभधारक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.