अहमदनगर बातम्या

खबरदार ‘या’ जागेत पुन्हा आला तर दोघांनाही जिवे ठार मारू…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  जागेच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांसह अन्य लोकांच्या विरोधात अनुसूचित जाती कायद्यान्वये तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.

याबाबत अधीक माहिती अशी कि, दत्तात्रय कांबळे व त्याचे मित्र कुलदीप भांडकर यांचे भांडकर ट्रान्सपोर्ट शेडच्या दुरुस्तीचे काम करीत असताना

आरोपी समर्थ प्रमोद भांडकर, मंगेश दिलीप भांडकर, दिलीप बबनराव भांडकर, प्रमोद बबनराव भांडकर, श्रीकांत श्रीकिसन जाजू हे सर्वजण तेथे आले.

तुम्ही येथे काम करू नका, असे म्हणून शिवीगाळ करू लागले. आरोपी समर्थ भांडकर व मंगेश भांडकर यांनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून

लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके व गजाने मारहाण केली. तसेच कुलदीप भांडकर यांना देखील मारहाण करून या जागेत पुन्हा आला तर दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

तर समर्थ प्रमोद भांडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कुलदीप भांडकर, सुभाष पवार, बबलु कांबळे, पप्पू चौनापुरे (सर्व रा. पाथर्डी) यांनी समर्थ व त्यांचे चुलते विजयकुमार भांडकर हे

कोरडगाव चौकाकडे जाऊन सामायिक जागेवर शेड ठोकू नका असे सांगत असताना त्यांनी फिर्यादी समर्थ भांडकर यांना शिवीगाळ व लोखंडी पाईपने मारहाण करून दुखापत केली. यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24