Ahmednagar News : आमच्या मनाप्रमाणे कुस्त्या लावा, नाहीतर तुमचा आखाडा होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन विश्वस्ताला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले,
की बाबासाहेब रामकृष्ण बाखुरे (वय ६२ वर्षे, बहिरवाडी, ता.नेवासा) भैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त आहेत. भैरवनाथ देवस्थानाची यात्रा सध्या सुरू होती. मंदिर परिसरात कुस्त्यांचा हंगाम चालु आहे. तेथे कुस्त्याचे कामकाज पाहण्यासाठी पंच म्हणून शिवाजी मारुती हारदे तसेच विश्वस्त सिताराम पंढरीनाथ घोरपडे, दुर्योधन अमरदास भोंगळे, भास्कर गणपत मिटकरे आणि इतर विश्वस्त उपस्थित होते.
सकाळी ६ वाजेच्या सुमारास कुस्ती लावण्यावरुन विश्वस्त शिवाजी मारुती हारदे यांच्या बरोबर गावातील महेश बाळासाहेब नळे, बाळासाहेब कुंडलिक नळघे, अंकुश कुंडलीक नळघे, अक्षय नंदु हेलाडे, ज्ञानेश्वर कैलास नळघे व तीन ते चार इसम असे हुज्जत घालत होते.
मी व गावातील लोकांनी त्यांना समजावून सांगुन त्याठिकाणाहून काढून दिले; परंतु थोड्याच वेळात ते पुन्हा परत कुस्त्याचा हगामा चालु असलेल्या ठिकाणी आले. तेव्हा आरोपींच्या हातात तलवार, लाकडी दांडे, लोखंडी कत्ती अशी हत्यारे होती.
या सर्वांनी आम्हाला आमच्या मित्राची कुस्ती लावत नाही, असे म्हणुन शिवीगाळ केली व अंगावर धावुन आले. बाळासाहेब नळघे याने लाकडी दांड्याने माझ्या उजवा हाताचे पंजावर मारून दुखापत केली. बाकीचे आमच्या अंगावर मारण्यास धावून आले. या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.