भैरवनाथ बेलवंडी सोसायटी निवडणूकीत सहजपणे एकहाती विजय मिळवणार – हिरवे .

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भविष्याच्या राजकारणात महत्वाची ठरणारी बेलवंडी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक सभेत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हीरवे यांनी आपल्या गटाचा सहजपणे विजय होईल असे सभासदांच्या बैठकीत म्हटले आहे .

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सभासद पोपटराव माने हे होते.सेवा सहकारी संस्था ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असतात त्याचे मालक हे शेतकरी सभासद असतात यामुळे येत्या निवडणुकीत विजय मिळवून १० वर्षांपासून बंद असलेला लाभांश १५ टक्क्याने पुन्हा सुरू करून शेतकरी वर्गाला आपण पुन्हा दिवाळी करण्याची संधी देणार असल्याचे वचन त्यांनी दिले .


मागील वेळेस दुष्काळ परिस्थितीमुळे आपण गावात वाद नकोत म्हणून संस्थेची निवडणूक वातावरण अनुकूल असताना देखील निवडणूक बिनविरोध केली होती परंतु याचा विपरीत परिणाम होऊन सत्ताधारी गैरफायदा घेऊन अगदी स्वतःला संध्याकाळी लागणाऱ्या चणे फुटाण्याचे बिल देखील संस्थेच्या इतर खर्चात दाखवून संस्थेची लूट करून शेतकरी सभासदांच्या तोंडाला लाभांश देते वेळी पाने पुसत असल्याची खरपूस टीका यावेळी विलास भोसले यांनी केली .

संस्थेचे अनेक विभागात कागदावर साहित्य खरेदी केल्याचे दाखवले आहे परंतु अनेक विभाग पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने त्यामध्ये खर्च दाखवलेले पैसे हे सत्ताधारी मौजमजा करण्यासाठी वापरतात असा आरोप अंकुश वाजे यांनी केला.

निवडणूक गावातील संस्थेची असताना स्वतःचे गैरप्रकार झाकण्यासाठी तालुक्यातील नेत्यांकडे बोट दाखवून सत्ताधारी हे सहानुभूती मिळवून रडीचा डाव करत असल्याचे कारखान्याचे संचालक सावता हिरवे यांनी व्यक्त केले .

यावेळी दिनेश इथापे, अशोक काळाणे,चंद्रकांत लबडे,मधुकर शेलार,संतोष शिंदे,भीमराव लबडे,अतुल वाजे,डॉ.शेलार यांची भाषणे झाले .तत्पूर्वी जिल्हा परिषद निवडणूक पूर्वीची बेलवंडी गटातील ही सर्वात हाय प्रोफाइल निवडणूक असल्याचे बोलले जातेय .

कारखाना निवडणूक पराभवानंतर , अण्णासाहेब शेलार यांना पुन्हा नागवडे गटाने आखलेल्या रणनीती चा कडवा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत असून एकंदरीतच दोन्ही गटातील टीका टिप्पणी मुळे प्रचार चांगलाच रंगत आणणार असल्याचे दिसत आहे .