Ahmednagar News : सध्या कॅफेच्या नावाखाली अनेक चुकीचे उदयोग केले जात आहेत. अशीच घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. शहरातील अकोलो रस्त्यावरील एका व्यापारी संकुलात तरुणांचे अधील चाळे सुरू असणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये अवील चाळे करताना आढळलेल्या मुला-मुलींना समज देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी कॅफेचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अकोले नाका परिसरात व्यापारी संकुलातील गाळा नं. २० मध्ये रिलॅक्स कॅफ नावाचे कॅफे मध्ये प्लायवुडचे विनापरवाना कंम्पार्टमेंट करुन, पडदे लावून, अंधार करून शाळा, कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी खेडकर यांना गुप्त खबऱ्यांमार्फत समजली. सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन तात्काळ कारवाई करावी, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस पथकाने या कॅफेवर छापा टाकला.
पोलीस आल्याची चाहूल लागताच कॅफेमधील काही इसम व मुली कॅफेच्या दुसऱ्या दरवाजाने पळून गेले, सदर कॅफेमध्ये छापा टाकला असता, त्यावेळी सदर ठिकाणी काउंटरवर असलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता, संकेत मल्हारी वाळके (वय २२, रा कसारा दुमाला ता. संगमनेर), असे नाव असल्याचे त्याने सांगितले. सदर कॅफेचा मालक आपण असून कॅफेमध्ये सर्व कामकाज मीच पाहतो असे सांगितले.
सदर कॅफेमध्ये मुले व मुली या अश्लिल चाळे करताना दिसले. पोलिसांनी या तरुणांना तोंडी समज देऊन सोडून दिले. कॅफेची पाहणी केली असता, ३ बाय ३ लांबी रुंदीचे प्लायवुडचे सुमारे ५ फुट उंचीचे विविध कप्पे व त्यास बाहेरच्या बाजुने पडदे बसविलेले आढळून आले.
कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफी शॉपचा परवाना दिसून आला नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साधणे दिसून आले नाही. याबाबत पोलिसांनी संकेत मल्हारी वाळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.