भंडारदरा परिसर पर्यटकांच्या गर्दीने झाला ओव्हरफ्लो…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालय. त्यामुळे डोंगर दऱ्यातून वाह्णारे छोटेछोटे धबधबे आणि निर्सगाचं सुंदर असं रुप पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केलीय.

विकेंडला तर इथं जत्रेचे स्वरुप आलं होतं. नगरसह मराठवाड्यातील लोकांचे या धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. धरण परिसर आणि आजूबाजूचे धबधबे पाहण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात.

यंदा धरण लवकर भरल्याने आणि सुट्टी आल्याने परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. दरम्यान शनिवार- रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांनी परिसरात मोठी गर्दी केली. तरुणाई मोठ्या प्रमाणात असल्याने स्पिलवे जवळील भिंतीवर उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

या ठिकाणी जाण्यास मज्जाव असल्याने या भिंतीवरून पाय घसरून आतापर्यंत दहा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र तरूण- तरूणी कुणाचही ऐकत नाहीत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्य़ता आहे. तरुण तरुणी या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढत आहेत.

अगदी कमी जागेत उभे राहून हा प्रकार सुरू आहे. जर पाय सरकला व झोक गेला तर मृत्यूला जवळ करणारी घटना दुर्दवाने घडू शकते. मात्र पोलिस व जलसंपदा विभागाचे नियंत्रण नसल्याने त्यांच्यावर बंधन नाही.

भंडारदरा जलाशयाचे संरक्षण करणारी यंत्रणा कोलमडली आहे. यापूर्वी पोलिसांवर हात उचलण्याचा प्रकार देखील झाला आहे.

जलाशयात फिरणाऱ्या होड्या देखील जोखीम पत्करून जलशयात पर्यटकांना घेऊन फिरताना दिसतात मात्र त्यांना लहान लावण्यासाठी यंत्रणा कमी पडत असून याबाबत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.