Ahmednagar News : भंडारदरा धरण विस्तापित शेतकऱ्यांची बैठक माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वखाली रतनवाडी येथे नुकतीच पार पडली.भंडारदरा परिसरातील साम्रद, घाटघर, उडदवणे, शिंगणवडी, मुरशेत, पांजरे, रतनवाडी, कोलटेभे मुतखेल ह्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वर्ग दोनच्या आहेत. सदर उताऱ्यावर कोणतीही पीक पाहणी आठ वर दिसत नाही.
पुर्णपणे पोटखराबा दिसत आल्याने शेतकऱ्यांच्या असलेले योजनाचा कोणताच लाभ ह्या शेतकऱ्यांना घेता येत नाही. त्यामुळे सदर उताऱ्यावर वर्ग दोन कमी करून वर्ग एक करावा व इतर पिकाची नोंद व्हावी
व हा प्रश्न कायमचा सुटावा या साठी माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समक्ष भेटून ऐकुन घेतल्या व तत्काळ प्रांताधिकारी संगमनेर यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधत सदर प्रश्नाबाबत बाबतची बैठक ६ ऑक्टोबर रोजी संगमनेर प्रांत कार्यालयात बैठक ठेवण्यास सांगितली..
या बैठकीसाठी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी, तहसीलदार असे सर्व अधिकारी यांच्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या बैठकीसाठी जेष्ठ नागरिक दगडु पांढरे, सरपंच संपत झडे, अमृता झडे, मारुती बांडे, बुधापाटील इंदे, चंदर गांगड़, भास्कर बुळे, भरत घाणे,
विजय भांगरे, पांडूरंग खाडे, तुकाराम खाडे, अनंत घाणे, सुनील सारुकते, संतोष सोडणार, नामदेव बांडे, लालू भांगरे, सुभाष बांडे, दत्ता ढगे, अशोक भांगरे, तुकाराम बांडे, काळू बांडे, सोमनाथ झडे, ज्ञानेश्वर झडे, शांताराम गीरहे, लक्ष्मण उघडे, प्रकाश उघडे व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.