अहमदनगर बातम्या

Bhandardara News : भंडारदऱ्याला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दीचे स्वरूप ! मात्र पर्यटकांना होतोय ‘हा’ त्रास

Published by
Ahmednagarlive24 Office

Bhandardara News : अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदऱ्याला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी अनेक पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर अभयारण्य क्षेत्रात वसुंधरा धबधधब्याखाली अनेक पर्यटकांनी भिजण्याचा आनंद घेतला.

अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे निसर्ग पर्यटनाची पंढरी समजली जाते. सप्टेंबर महिण्यात गणेशोत्सव असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली होती; परंतु गुरुवारी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आणि पर्यटकांची संख्या वाढु लागली.

विसर्जनाची सुट्टी, दुसऱ्या दिवशी शासनाकडुन जाहीर झालेली ईदची सुट्टी तर शनिवार व रविवार विक एंड त्यातच २ आक्टोबरला गांधी जंयती अशी पाच दिवस सलग सुट्ट्या आल्या.

त्यामुळे साहजीकच भंडारदऱ्याला पर्यटकांची गर्दी होणे अपेक्षित होते. शुक्रवारपासून सुरु झालेली गर्दी सोमवारी दुपारपर्यंत टिकून होती. या दरम्यान भंडारदऱ्यातील प्रत्येक हॉटेल हाऊसफुल्ल असल्याचे दिसून आले.

शुक्रवारी भंडारदऱ्याला पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे अभयारण्यात असणारे सगळे धबधबे ओसंडून वाहत होते. हे धबधबे म्हणजे पर्यटकांसाठी खास पर्वणी होती. त्यातच नेकलेस फॉल व नान्ही फॉल कमी प्रमाणात वाहात असले, तरी वसुधरा धबधबा व कोलटेंभे धबधबे मनमुराद कोसळत होते.

त्यामुळे तेथे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. वसुंधरा धबधब्याच्या आसपास पर्यटक डुंबताना तसेच तेथील मोठ्या शिळावर फोटो सेशन करण्यासाठी अनेक पर्यटक जिवाचा आटापिटा करताना दिसुन आले.

सांडव्याच्या आसपास तासनतास वाहतुक कोंडी झाली. सलग पाच दिवस सुट्टी असल्याने प्रशासनाकडुन नियोजन होणे अपेक्षित होते; परंतु नियोजनाच्या अभावी अनेक पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडले. भंडारदरा धरणामध्ये पर्यटकांनी सर्वात जास्त बोटींगसाठी प्राधान्य दिले. सांदनदरीला पर्यटक पसंती देताना दिसून आले.

Ahmednagarlive24 Office