भिंगारचा पाणीपुरवठा विस्कळीत पाणीप्रश्न चर्चा करुन मार्गी लावू : महापौर बाबासाहेब वाकळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- भिंगार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. आठवड्यातून ४-५ दिवसानंतर पाणी सोडले जाते.

भिंगार शहराला गेली ५0 वर्षांपासून आर्मीची संस्था एम.ई.एस. या संस्थेमार्फत पाणी पुरवठा होत आहे. शहरामध्ये दिवसेंदिवस नळ कनेक्शनची मागणी वाढत आहे. भिंगार शहरातील नागरिक व्यावसायिक दराने म्हणजे वर्षाला दोन हजार रुपयांची पाणीपट्टी छावणी परिषद आकारीत आहे. एम.ई.एस. या संस्थेची कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी थकीत नाही.

तरी देखील या संस्थेकडून पाणीपुरवठा नियमित न झाल्याने वर्षातून फक्त ५-६ महिनेच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागते तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी अहमदनगर महानगरपालिका व छावणी परिषद यांच्यामध्ये पाणीपुरवठ्याचा करार करून

महानगरपालिकेने भिंगार शहराला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भिंगार शहर भाजपाच्यावतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे करताना भाजप नगरसेविका शुभांगी साठे, भाजपा शहराध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे, भिंगार उपाध्यक्ष गणेश साठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटोरे यांनी केली.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, लवकरच महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व छावणी परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावून पाणीपुरवठा संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जाईल. असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24