जामखेड शहरासाठी १४० कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचा, तसेच जामखेड शहरातील व तालुक्यातील अशा २२७ कोटी ७७ लाख ६६ हजार रकमेच्या विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा शनिवारी १३ नाेव्हेंबर होणार सायंकाही ५.३० वाजता येथील बाजार तळावर होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे येणार आहेत, अशी आमदार रोहित पवार यांनी दिली.
जामखेड शहर व अंतर्गत वाड्या वस्त्यांसाठी उजनी धरणातून १४० कोटी पाणीपुरवठा योजना जामखेड शहरातील रस्त्यांसाठी १५ कोटी सार्वजनिक सभागृहासाठी १ कोटी ५०लाख तालुक्यातील तलाठी कार्यालयासाठी ८ कोटी ८२लाख २८ हजार व्यापारी संकुलासाठी ९ कोटी शासकीय विश्रामगृहासाठी ४Bकोटी ३०लाख ७० हजार
पंचायत समितीच्या दुसाऱ्या मजल्यावरील कार्यालयासाठी ३ कोटी ८८ लाख ९० हजार तसेच पंचायत समितीच्या पदाधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी १० कोटी ९१ लाख पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी ८ कोटी ८९ लाख महसूल कर्मचारी निवासस्थानासाठी १२ कोटी ६ लाख ७८ हजार बसस्थानक
व बसस्थानकावर व्यापारी संकुलासाठी ७ कोटी ८९ लाख सार्वजनिक वाचनालयासाठी १कोटी ५०लाख नाना नानी पार्कसाठी २ कोटी तपनेश्वर आमरधामसाठी २ कोटी असे २२७ कोटी ७७ लाख ६६ हजार निधीच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. यातील बसस्थानक व पोलिस वसाहतीचे काम सुरू झाले आहे.