अहमदनगर बातम्या

भुसार, फळे भाजीपाला बाजार दोन दिवस राहणार बंद ..? शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सालाबादप्रमाणे त्रंबकेश्वरवरुन निघालेला संत निवृत्तीनाथ महाराजांचा पंढरपुर पायी दिंडी सोहळा आगामी दोन दिवस अहमदनगरमध्ये मुक्कामी असणार आहे. त्यामुळे हे दोन दिवस बाजार समितीच्या भुसार, फळे भाजीपाला बाजार दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषि उत्पन्न बाजार समितीकडून कळवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कृषि उत्पन्न बाजार समितीत सालाबादप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्रंबकेश्वरवरुन श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळा मंगळवार दि. २ व बुधवार दि. ३/०७/२०२४ या दोन दिवसांकरीता मुक्कामासाठी येणार आहे.

दि. ४ रोजी प्रस्थान करणार आहे. सदरची दिंडी समितीचे भुसार व भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे ५०,००० वारकरी सहभागी आहेत. त्या अनुषंगाने बुधवार दि. ३/०७/२०२४ व गुरुवार दि. ४/०७/२०२४ या दोन दिवसांकरीता समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व भाजीपाला बाजार बंद, राहणार असून शुक्रवार दि.५/०७/२०२४ रोजीपासून बाजार नियमित चालु राहील.

त्यामुळे भुसार, फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवानी सदरचे बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले आहे. यावेळेस समितीचे सर्व संचालक मंडळ, सचिव अभय भिसे, सहा. सचिव बाळासाहेब लबडे, सहा. सचिव सचिन सातपुते, सहा. सचिव संजय काळे हे उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office