अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी शिर्डी -दौंड- पुणे- मुंबई ही जलद पॅसेंजर 19 बोगीची करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
13 ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक झूम अॅपद्वारे संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड व विशाल फोपळे यांनी जलद पॅसेंजर 19 बोगीची स्वतंत्र सुरू करण्याची मागणी केली.
त्यानुसार नविन वेळापत्रकामध्ये या स्वतंत्र गाडीचा समावेश करून दौंड बायपास मार्गे पुणेकडे जाणार आहे. या स्वतंत्र गाडीमुळे साईभक्तांची सोय होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे
असे श्रीगोड यांनी सांगितले. शिर्डी हे साईभक्तांची पंढरी आहे. याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तसेच देशभरातून अनेक भाविक याठिकाणी येत असतात.
या पॅसेंजरमुळे भाविकांना प्रवास सुलभ होणार असून वेळही वाचणार आहे. दरम्यान, या बैठकीत बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानक वरील दुर्लक्षीत मागण्यांसंदर्भात चर्चा होऊन
प्लॅटफार्म नं. 1 व 2 वरील मालधक्क्याजवळ जोडणारा ब्रीज व 24 बोगी थांबू शकतील असा मोठा प्लॅटफार्म करण्याचे व त्याचे काम त्वरीत सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
तसेच प्लॅटफॉर्म नंबर 2 वर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधण्याचे व उपहारगृह व फ्रुट स्टॉल करिता मंजुरी घेऊन सुरू करण्याचे आश्वासन दिले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved