अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधकांची आंदोलने आणि शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी आपली भूमिका बदलली आहे.
सध्याचे पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम थांबविण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.
मात्र, इतर ग्राहकांनी वीज बिलांची थकबाकी वेळेत भरावी, असे आवाहनही राऊत यांनी केलं आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यापासून रोहित्र बंद करण्यापर्यंतची कारवाई महावितरण कंपनीने सुरू केली होती.
त्याचे तीव्र पडसाद शेतकरी आणि विरोधकांमधून उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने होत असताना आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं.
विधिमंडळाचं कामकाज चालू न देण्याची भूमिकाही घेतली. सरकारनं वीज तोडणी तातडीने थांबवावी. अन्यथा आम्ही हा विषय सभागृहात लावून धरू, असा इशारा विरोधीपत्र नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या अधिवेशनात मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं स्पष्टपणे म्हटलं होतं. असे असताना अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता का होत नाही? असा सवालही विरोधकांनी केला.
त्यानंतर बोलताना ऊर्जामंत्री राऊत यांनी ही घोषणा केली. त्यामुळं आता या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू झालेला वाद थांबणार असून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांनाही मोठी दिलासा मिळणार आहे.
अन्य ग्राहकांना वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी राऊत यांनी विनंती केली आहे. त्यामुळं आता वसुलीसाठी त्यांच्याकडं मोर्चा वळलिला