अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही गावात विना परवानगी येणार्या व त्या व्यक्तीस सहारा देणार्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिला आहे.
याबाबत तहसीलदारांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपययोजना एक भाग म्हणुन पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावात विना परवानगी येणार्या नागरिकांना प्रतिबंध केला आहे.
तालुक्यातील कोणत्याही गावात एखादी व्यक्ती विनापरवानगी आल्यास व सदर व्यक्तीस आसरा देणार्यास अशा दोघांवरही प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले
म्हणून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पाथर्डी तालुक्यात येण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com