बिग ब्रेकिंग : केव्हा सुरु होणार राज्यातील कॉलेज ? मंत्री उदय सामंत म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज सुरु झालेली नाहीत. दरम्यान आता ते केव्हा सुरु होणार याची माहित्ती समोर आली आहे.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाचं शैक्षणिक वर्षा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल.

मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, असं सामंत म्हणाले. 1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.

तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे.

उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं आहे.

कोरोना कमी झालेला आहे, तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरीता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल, असं सामंत म्हणाले.

दरम्यान राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता मिळालीय. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाईल अर्थ विभागाकडे जाईल.

राज्यात 3074 प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. सीएचबी तत्वावर प्राध्यापकांनाही चांगले मानधन मिळेल याचाही विचार करतोय.