अहमदनगर बातम्या

मोठा निर्णय ! शिर्डी विमानतळाच्या भोवती शहर वसवलं जाणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील साईबाबांचे तीर्थस्थळ असलेले शिर्डी येथून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी विमानतळा सभोवतालचा परिसर विकसित करून

सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली.

वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली.

एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या विकसित भागाचे नाव असेल”, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे.दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात.

शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल,

रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office