अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कांद्याच्या दरात मोठी घसरण, मिळतोय ‘हा’ भाव ! निर्यातबंदी उठवल्याचा फायदा नाहीच..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यात अहमदनगर जिल्हा आता आघाडीवर येऊ लागला आहे. नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकापेक्षा कांद्याकडे आपला मोर्चा वळवला.

परंतु या वर्षात निर्यातबंदीचे ग्रहण लागले आणि कांद्याचे दर खूपच घसरले. यावर गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याची चर्चा झाली.

त्यामुळे कांदा २ हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेला. या दरात अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा असताना दरात घसरण झाली. आठवडाभरापासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपयांवर स्थिर आहेत. या दरात अद्याप अपेक्षित दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा असून कांद्याची खरोखर निर्यातबंदी उठवली का अशी चर्चा सुरु आहे.

एकीकडे पाणी नाही. आर्थिक ओढाताण पाचवीला पुजलेली. पण अशा स्थितीत मोठ्या प्रयत्नाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबरअखेर कांद्याचे भाव अवघे १ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलवर होते.

त्यानंतर निर्यातबंदी उठवताच सुरुवातीचे काही दिवस दरात उसळी पहायला मिळाली. हे दर दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले होते. परंतु, पुन्हा घसरण झाली आहे. जिल्ह्यात २२ मार्चला कांद्याचे भाव १२०० ते १५०० रूपयांवर पोहोचले.

एप्रिलमच्या पहिल्या आठवड्यात त्यात सुधारणा होऊन ४ एप्रिलला एक नंबर कांदा १४५० ते १७०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. सोमवारी (८ एप्रिल) या दरात पुन्हा घसरण होऊन, एक नंबर कांदा १२०० ते १६०० दराने विकला गेला. मागील काही दिवसांत कांद्याचे भाव १२०० ते १५०० पर्यंत स्थिर राहिल्याचे चित्र आहे.

असे आहेत कांद्याचे दर (प्रतिक्विंटल)

नगर बाजार समिती

२१ मार्च-१२०० ते १५००

२३ मार्च-१२०० ते १६००

४ एप्रिल-१४५० ते १७००

८ एप्रिल-१२०० ते १६००

राहुरी / वांबोरी बाजार समिती

२२ मार्च-१०००-१५००

२३ मार्च-१२०० ते १५००

४ एप्रिल-१६०० ते १७००

८ एप्रिल-१२०० ते १५००

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office