अहमदनगर बातम्या

कापूस पिकाचे मोठे नुकसान !शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका …

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सलग भीज पावसामुळे कौठा परिसरात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने वेचणीला आलेल्या कापूस काळा पडत आहे. चांदा महसूल मंडलात या वर्षी ३०० ते ४०० हेक्टर क्षेत्र कपाशी लागवड झाली आहे.

मात्र सलग भिीज पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पांढरे सोने काळे पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे.

सुरुवातीला पाऊस नसल्याने व वीजपुरवठा सुरळीत नसल्याने त्यात आणखी भर रासायनिक खतांची टंचाई. रासायनिक खते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

परिणामी काळ्या बाजाराने युरिया खरेदी करावा लागला. या संकटातून कसाबसा सावरलेला शेतकरी पुन्हा सलग पडणाऱ्या भीज पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान होत आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे दोन्ही हंगाम वाया गेले. राज्य शासनाने आर्थिक मदतीची घोषणा केली त्यानुसार कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे केले.

पण नुकसानबाधित शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. या वर्षीही असेच नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला

Ahmednagarlive24 Office