अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय विश्वनाथ शिंदे (वय 52, रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) यांचे एक अपघातात निधन झाले आहे.
हा अपघात आज रविवारी पहाटेच्या सुमारास घटला. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगरहून शेवगावकडे जात असतांना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटून बोलेरो जीप पलटी झाली.
बोलेरो पलटी झाल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी व पहाटे फिरण्यासाठी येणार्या लोकांनी मदतकार्य केले. उपचारासाठी त्यांना तिसगाव येथील रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे. सध्या ते शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणुन कार्यरत होते.