अहमदनगर बातम्या

मोठी बातमी ! हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :-  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे पालकमंत्रीपद सोडणार असल्याची मोठी चर्चा सध्या रंगल्या आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर ते जिल्ह्याला पुरेसा वेळ दिला नाही, ते फार कमी वेळेस नगर जिल्ह्यात येतात तसेच जिल्हा नियोजन समिती बैठकीस ते उपस्थित नसतात अशा अनेक टीका त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर खुद्द मुश्रीफ यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. नेमके काय म्हणाले मुश्रीफ ? जाणून घेऊ नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी अनेक निवडणुका आगामी काळात होणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीचाही त्यात समावेश आहे. एक मंत्री अशा स्थितीत दोन जिल्ह्यांकडे कसे लक्ष देऊ शकणार.

गृह जिल्हा म्हणून मला कोल्हापूरकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार असल्याच्या वृत्ताला त्यांनी एकप्रकारे दुजोरा दिला अहमदनगरचे पालकमंत्री पद स्वीकारतानाच त्यांनी आपण अहमदनगरचे पालकमंत्रीपद दोनवर्षांसाठीच स्वीकारू,

त्यानंतर या पदावरून मुक्त करण्याचे त्यांनी ठरवले होते, त्या नुसार मुश्रीफ यांनी अहमदनगरच्या पालकमंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office