मोठी बातमी : जिल्ह्यातील या साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यात विविध बाबतीत तफावत आढळल्याच्या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी चौकशी करून

अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी संस्थांचे प्रथम विशेष लेखापरीक्षकांना दिले असल्याचे शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी मंगळवारी सांगितले.

ताके, रामचंद्र पटारे, भारत आसने, संदीप आदिक, दत्तात्रय लिप्टे, राजेंद्र भांड आदींनी तक्रार केली होती. सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीचा

उत्पादन खर्च व सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू झाल्यानंतरचा उत्पादन खर्च यात मोठी तफावत आढळली. गेल्या ६ वर्षांत ३८ ते ३९ कोटी अतिरिक्त खर्च झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

 | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24