अहमदनगर बातम्या

मोठी बातमी ! राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अडकले ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यातील अनेक दिग्गज मंत्र्यांना जर जर करून सोडणाऱ्या ईडीची कारवाई म्हणजे नेतेमंडळींना घाम फोडतो. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे.

यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने चौकशी केल्यामुळे पुन्हा चर्चांना उधण आलं आहे.

तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती.

त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर 2012 सालात लिलाव करण्यात आला होता.

हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनी ने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे. या अनुषणगाने ईडी चौकशी करत आहे. आज प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आपलं होतं. त्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office