अहमदनगर बातम्या

मोठी बातमी ! साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- केंद्रीय गृहमंत्रालयाकडील विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने साईसंस्थानचे विदेशी चलनाचे खाते 1 जानेवारी पासुन गोठवण्यात आले आहे.

या कारवाईमुळे साई संस्थानाचे लाखो रुपये अडकून पडले आहे. अधिक माहिती अशी, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एफसीआरए कायद्यानुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत खात्याचे

नुतनीकरण न केल्याने देशातील जवळपास सहा हजार व महाराष्ट्रातील 1263 अशासकीय संस्थांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

त्यामध्ये साईसंस्थानसह तिरूपती देवस्थानाचाही समावेश आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक मदत मिळते.

खाती गोठावण्यात आल्याने मदतीचा ओघ थांबला आहे. पदाधिकाऱ्यांची केवायसी उपलब्ध न झाल्याने नुतनीकरण रखडल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन व्यवस्थापन आल्यानंतर सर्व विश्वस्तांची केवायसी करून 25 डिसेंबरला संस्थानने नुतनीकरणासाठी अर्ज दाखल केला आहे.

परंतु, आयबीकडून पडताळणी प्रलंबित असल्याने संस्थानचेही खाते गोठवण्यात आले. लवकरच हे खाते कार्यान्वित होईल असे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

Ahmednagarlive24 Office