अहमदनगर बातम्या

मोठी बातमी ! एसटी महामंडळाच्या लालपरीची आसन व्यवस्था बदलणार, 1 जानेवारीपासून ST Bus मध्ये राहणार अशी आसन व्यवस्था

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra ST Bus Seating Arrangement : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. एसटी महामंडळाच्या लाल परी मधून दररोज लाखो नागरिक प्रवास करत असतात. महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटी मधून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या अधिक आहे.

दरम्यान या लाखो एसटी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जात असतात. एसटी प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी एसटी महामंडळ नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. अशातच आता काही सवलतधारी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या लाल परीची आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळ सदस्यांची आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे. आता विधिमंडळ सदस्यांना साध्या बसेसमध्ये १, २ ऐवजी ७, ८ आसन राखीव राहणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

एवढेच नाही तर एसटीमध्ये आता दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था सुद्धा बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून होणार आहे.

म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच एसटी महामंडळाच्या बसेस मधील नवीन आसन व्यवस्था यासंबंधीत सवलतदारी प्रवाशांना लागू केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एसटी महामंडळाच्या माध्यमातून साधी, निमआराम, विनावानानुकूलित शयनआसनी, शिवशाही आसनी, मिडी, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयान, बसेसमध्ये राखीव आसने उपलब्ध करुन दिली जातात.

मात्र बस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांक देखील वेगवेगळे आहेत. हेच कारण आहे की यामध्ये सुसंगतता यावी यासाठी आसन क्रमांक बदलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती.

सवलतधारी प्रवाशांसाठी आसन व्यवस्था बदलली गेली पाहिजे अशी मागणी होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाकडून ही आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे. याची अंमलबजावणी मात्र एक जानेवारी 2024 पासून होणार आहे, यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.

Ahmednagarlive24 Office