मोठी बातमी! अहमदनगरमधील ‘ह्या’ खासगी रुग्णालयांतील ‘इतके’ बेड आरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वाना उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरातील 17 हॉस्पिटलमधील 740 बेड्सपैकी 40 टक्के बेड म्हणजेच 296 बेड हे कोरोनासाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.

आता संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आणि आवश्यक कर्मचार्‍यांना त्या ठिकाणी दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांवर उपचार करावा लागणार आहे.

मनपा हद्दीतील 17 खासगी रुग्णालयात 740 बेडस् बसून यातील 40 टक्के बेड्स म्हणजेच 296 बेड या करोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

 ‘हे’ आहेत हॉस्पिटल आणि आरक्षित बेडस् -: अंबीका नर्सिंग होम केडगाव एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14, स्पीटल चौपाटी कारंजा एकूण बेड 38 आणि आरक्षित बेड 15, अनभुले हॉस्पीटल प्रेमदान चौक एकूण बेड 33 आणि आरक्षित बेड 13, खालकर हॉस्पीटल सथ्था कॉलनी एकूण बेड 40 आणि आरक्षित बेड 16, गॅलक्सी हॉस्पीटल झोपडी कॉन्टीन जवळ एकूण बेड 47 आणि आरक्षित बेड 19, बालाजी पिडीयाट्रिक अण्ड डेंटल हॉस्पीटल एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14, झावरे पाटील हॉस्पीटल अण्ड नर्सिंग होम रावबहादुर नगर एकूण बेड 31 आणि आरक्षित बेड 12, प्रणव हॉस्पीटल मल्टीस्पेशाल्लीटी अण्ड आयसीय सेंटर एकूण बेड 44 आणि आरक्षित बेड 18, पाटील अँक्सीडेन्ट हॉस्पीटल कोठीचॉक एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14, फाटके पाटील हॉस्पीटल स्टेशन रोड एकूण बेड 40 आणि आरक्षित बेड 16, अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सावेडी एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14, श्रीदिप हॉस्पिटल बडवे पेट्रोलपंप एकूण बेड 53 आणि आरक्षित बेड 21, सिध्दविनायक सक्कर चौक एकूण बेड 60 आणि आरक्षित बेड 24, क्रीस्टल हॉस्पिटल झोपडी कॅटिंग एकूण बेड 59 आणि आरक्षित बेड 24, सिटी केअर ट्रस्ट हॉस्पीटल, तारकपुर एकूण बेड 59 आणि आरक्षित बेड 20, देशपांडे हॉस्पिटल पटर्वधन चौक एकूण बेड 63 आणि आरक्षित बेड 25, आरोग्य अग्रवाल हॉस्पिटल स्वामी समर्थ मंदिर एकूण बेड 42 आणि आरक्षित बेड 17 यांचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24