शिवसेनेच्या नेत्याकडून राधाकृष्ण विखे पाटलांना मोठी ऑफर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक वक्तव्य करुन सध्या नगर जिल्ह्याच्या राजकरणासह राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी शिवसेनेची ऑफर घेऊन आल्याचं मंत्री सत्तार यांनी साांगितले.

अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. आज पंचायत समितीच्या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी सत्तार येथे आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केले आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला लोणी गावात दाखल झाले होते. त्यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत चर्चा झाली आणि दोघांनी घरी स्नेहभोजनही केलं.

खरं तर विखे पाटील भाजपात जात असताना सोबत कोण जाणार ही चर्चा होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपात. आज शिवसेना सत्तेत आहे तर भाजप विरोधात आहे. विखे पाटील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, त्यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफर सत्तार यांनी विखे पाटील यांना दिली आहे.

या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबद्दल मी बोलणार असून अंतिम निर्णय ते घेतील, असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24