अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आता पर्यंत धक्का लागताना दिसत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या गावात वीस वर्षापासून ताब्यात असलेली ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे.
तर आता संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का लागला आहे.
अनेक वर्षापासून हाती असलेल्या कनोली ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने सहा जागा जिंकून बाळासाहेब थोरात यांना धक्का दिला आहे . कानोली ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या आहेत.