बाळ बोठे बाबत सर्वात मोठी बातमी : प्रॉपर्टी जप्तीची कारवाई ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाने नगर जिल्हा चांगलाच हादरला आहे. यातच या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे गेल्या काही दिवसांपासून फरार आहे.

बोठे याचा शोध अद्यापही न लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी स्टँडिंग वॉरंट देखील जारी केले आहे. स्टँडिंग वॉरंटनंतर बोठे सापडत नसल्याने आता पोलीस प्रॉपर्टी जप्तीची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

रेखा जरे हत्याकांडाचा सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या प्रापर्टीचे सर्चिंग पोलिसांनी सुरू केले आहे. बोठेचे प्रापर्टी कोठे आणि किती याची माहिती पोलिसांनी नगर आणि पुणे कलेक्टरांकडे मागविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जरे यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

अटकेतील पाच जणांच्या माहितीनुसार पत्रकार बाळ. ज. बोठे हा सूत्रधार असल्याचे समोर आले. मात्र अटकेपूर्वीच तो नगरमधून पसार झाला. बोठेचा शोध सुरु आहे. बोठेला पकडण्यासाठी स्टँडिंग वॉरंट मिळवित पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे.

स्टॅडिंंग वॉरंटनंतर त्याची प्रॉपर्टी जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी त्याच्या मालमत्तेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. नगर आणि पुणे कलेक्टरांना पत्र पाठवून त्याच्या मालमत्तेची माहिती पाठविण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.

नगरच्या सेशन कोर्टाने बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी 28 तारखेला सुनावणी ठेवण्यात आली आहे. कोर्टाची सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24