वाढदिवस आ.रोहितदादांचा, भेट दादासाहेबांची; ‘हे’ पाहून सगळेच अचंबित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कर्जत येथील त्यांच्या वाढदिवसनिमित्ताने एकाने दिलेल्या भेटीने सगळेच कौतुकाने अचंबित झाले.

सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दादासाहेब थोरात यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटरला दोन लाखांची मदत दिली आहे.

या रकमेचा धनादेश आमदार पवार यांचे हस्ते वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सुचेता यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या अशा कौतुकास्पद भेटीने आणि उपक्रमाचे सर्वानीच कौतुक केले.

यावेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, दादासाहेब थोरातांसारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्या व्यवसायात यश मिळविल्यानंतर सामाजिक जाणिवेतून मदत देणे कौतुकास्पद आहे.

युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेली मदत महत्वाची आहे. इतरांनी हा आदर्श पुढे ठेवावा. दादासाहेब थोरात म्हणाले, जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरीत आहोत.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्वकष्टातून वेगळी भेट दिल्याचे समाधान आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24