चार वाहनांचा विचित्र अपघात;तृतीयपंथी जागीच ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-  तृतीयपंथीला पैसे देण्यास थांबलेल्या कारला अन्य दोन कारने धडक दिली. तर प्रसंगावधान राखत आयशर टॅम्पो चालकाने दुभाजकावर वाहन घातल्याने अनर्थ टळला.

चार वाहनांचा हा अपघात शनिवारी दुपारी १ वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल स्टेटस समोर घडला. यात तृतीयपंथी जागीच ठार झाला आहे. कारमधील दोघे जखमी झाले.

पुण्याकडून नाशिकला जाणारी स्वीफ्ट कार (एमएच १२ इएक्स २७२८) चालकाने तृतीयपंथीला पैसे देण्यासाठी थांबवली. मात्र नाशिकलाच वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच१४ एचक्यू १७२८) पाठीमागून धडक दिली.

मागेच असणाऱ्या कार (एमएच ११ बीडी ६०९३) यावरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली. तर या तीन वाहनांच्या मागे असणारा

आशयर टॅम्पो (एमएच १५ इएफ २९९९) वरील चालकाने प्रसंगावधान राखत टॅम्पो महामार्गाच्या दुभाजकावर चढवला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

या अपघातात तिन्ही कारचे नुकसान होऊन महामार्गावर पडल्या होत्या. या घटनेत साई अंकिता साथी या तृतीयपंथीचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील शैलेश श्रीराम बिर्ला (५२), सोनल बिर्ला (४६, हडपसर, पुणे) हे दोघे गंभीर झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24