अहमदनगर बातम्या

भाजप नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

त्यामुळे राहाता तालुक्यात निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.

प्रत्येक पक्षाची निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली असून आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन राहात्याचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरेसवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे येणारी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहात्याचे विद्यमान जेष्ठ नगरसेवक निवृत्ती गाडेकर व त्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बंडूनाना वाबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश केला आहे.

त्यांचे साईबाबा संस्थान चे अध्यक्ष आ.आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी तत्परतेने कामाला लागा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे, ओ.बी.सी सेल चे शहराध्यक्ष शेखर जमधडे, गुलशर शेख, युवक काँग्रेसचे जाईद दारुवाले, हेमंत अनाप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office