अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आज (31 ऑक्टोबर) श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यानंतर या सर्व सदस्यांनी संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे. यामुळे भाजपाला मोठी खिंडार पडले असल्याची समजते आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने सदस्यांनी राजीनामा दिल्याने श्रीरामपूर मधील राजकरणात चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि,
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. यामुळे तालुक्यातील भाजपाच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
गोंदकर पक्षाचे ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत करतात’, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली. जिल्हाध्यक्षांवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना केली आहे. जिल्हाध्यक्षांचा कोणताही निर्णय ही समिती मान्य करणार नसल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved