अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-वीज बिल वसुली थांबविण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात आक्रमक होत भाजपने आज आंदोलन केले.
तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आज रस्त्यावर उतरली व केंद्र सरकारचा निषेध केला. त्याचबरोबर नगर शहर शिवसेनेने बैलगाडीतून प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.
जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेने हे आंदोलन केले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरवाढीचा भाव पन्नास टक्के पेक्षा कमी झालेला असतानाही 80 ते 90 रुपये लिटर इंधन दरवाढ मोदी सरकार करत आहे.
त्याचा निषेध म्हणून हे निदर्शने नगरसह रज्यभर होत असल्याची माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, संजय शेंडगे,
युवा सेनेचे विक्रम राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, श्याम नळकांडे, संदेश कार्ले, मदन आढाव, अमोल येवले, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश बोरूडे, गणेश कवडे, शरद झोडगे,