अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं होत. मात्र, तरीही कोरोना आटोक्यात आला नाही. त्यानंतर देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे.
यामधून सार्वजनिक सण-उत्सवांना बंदी घातलेली आहे. राज्यातील मंदिरे बंद आहेत. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दारूची दुकाने, मॉल, महामार्गावरील ढाबे सुरू करण्यात आली आहेत.
मात्र मंदिरे बंद का ? असा सवाल भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
या राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळेच जनता आता राज्यभरातील मंदिरासमोर ‘दार उघड उद्धवा दार उघड’ असा नारा देत घंटानाद आंदोलन करणार आहे.
इतर राज्यातील मंदिरे ही भाविकांना दर्शनासाठी खुली केलेली असताना महाराष्ट्र राज्यातील मंदिरे कोव्हिड 19 ची भीती दाखवून अजून का उघडली जात नाही.
यामागील सरकारचे नेमके काय उद्दिष्टे आहेत? राज्यातील अनेक मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाच्या नियमानुसार अटीशर्तीचे पालन करत दर्शनरांगेत बदल करून दर्शनासाठी व्यवस्था तसेच सर्व तयारी पूर्ण केली आहे.
काही देवस्थानच्यावतीने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तरीदेखील अजूनही मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करत आहे. या अन्यायी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळेच जनता आता राज्यभरातील मंदिरासमोर दार उघड उद्धवा दार उघड असा नारा देत घंटानाद आंदोलन करणार असून या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गोंदकर यांनी केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved