अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेने कोविड-१९ रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी भाजपने पालिकेच्या प्रवेशद्वारात सोमवारी साखळी उपोषण केले.
पालिकेने १०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरू करावे, शहरात दररोज निर्जंतुकीकरण फवारणी करावी, कोविड चाचणी व औषधे विनामूल्य उपलब्ध करून घ्यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
ह्या उपोषणात तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, जावेद जहागीरदार, नगरसेविका मेघा भगत आदी सहभागी झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com