शिर्डीच्या जागेवर भाजपाचा दावा, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला मोठा अडसर ? शिर्डीच्या जागेवर महायुतीमधून कोण उभे राहणार ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे राज्यात सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

राजकीय पक्षांनी देखील आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत.

यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण खूपच तापलेले आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ.

महायुतीकडून या दोन्ही जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे ठरलेले नाही. मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विजय मिळवला होता. यामुळे यावेळी देखील सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार अशा चर्चा आहेत.

मात्र सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत अजूनही ठामपणे सांगता येणार नाही. याचे कारण म्हणजे त्यांना स्व पक्षातून आमदार राम शिंदे यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी अजून नगर दक्षिणसाठी उमेदवार फायनल झालेला नसून माझेही नाव शर्यतीत असल्याचे सांगत विखे यांना आव्हान दिले आहे. याशिवाय महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार यांचा गट) मधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीदेखील सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

म्हणजेच नगर दक्षिण जागेसाठी महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे या जागेवर महायुतीकडून कोण उभे राहणार हे आत्ताच ठामपणे सांगता येणे शक्य नाही. दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत देखील असेच चित्र तयार होऊ लागले आहे.

आतापर्यंत या जागेवरून एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार आणि सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी मिळणार असे वाटत होते. मात्र आता सदाशिव लोखंडे यांना देखील महायुती मधून आव्हान मिळत आहे. खरंतर आतापर्यंत सदाशिव लोखंडे यांनी दोनदा लोकसभेसाठी उमेदवारी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा उभे राहणार आहेत. मात्र ही तिसरी वेळ त्यांच्यासाठी मोठी कसरतीची राहणार आहे. कारण की शिर्डी लोकसभा जागेसाठी महायुतीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे.

सदाशिव लोखंडे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपामधून केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडलेले होते. ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून 1999 आणि 2004 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत गेले होते.

पुढे 2009 मध्ये लोखंडे यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. कुर्ला विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेकडून उमेदवारी केली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि पुढे परत त्यांनी घरवापसी केली. मात्र 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेने त्यांना शिर्डी लोकसभेचे तिकीट दिले. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती असल्याने मोदी लाटेत त्यांना 2014 मध्ये विजय देखील मिळाला. पुढे मग 2019 मध्ये त्यांना याच जागेवरून खासदारकीचे तिकीट मिळाले आणि पुन्हा ते विजयी झालेत.

दरम्यान शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता 2024 मध्ये पुन्हा ते या जागेसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे या जागेसाठी दुसरा कोणताच उमेदवार नसल्याने महायुती मधून जर शिंदे गटाला उमेदवारी मिळाली तर त्यांना तिकीट मिळणार हे जवळपास कन्फर्म आहे.

मात्र आता शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून इच्छा व्यक्त होत आहे. शिर्डी लोकसभा लढवण्याचे भाजपाने संकेत दिलेले आहेत. यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा खासदारकीसाठी तिकीट मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

दुसरीकडे लोखंडे यांचा मतदारसंघात खूपच कमकुवत जनसंपर्क असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. त्यांनी मतदारसंघात चांगली कामे केली आहेत यामुळे ते दोन टर्म खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र त्यांचा मतदारसंघातला जनसंपर्क कमी असल्याने मतदारसंघातील मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे आता त्यांना महायुतीमधून या जागेसाठी तिकीट मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान या जागेवर भाजपाने दावा ठोकला असल्याने महायुतीमध्ये देखील निवडणुकांपूर्वी जागा वाटपावरून गदारोळ होऊ शकतो. यामुळे आता जिल्ह्यातील या दोन्ही जागांसाठी महायुतीकडून कोणकोणते उमेदवार उभे राहणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.