अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी आजी, माजी आमदारांना चकवा देत राष्ट्रवादीचा रस्ता धरल्याने भाजपाची सत्ता गेली.
घायतडक यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी केलेली खेळी मात्र कसलेल्या राजकारण्यांना अंजन घालणारी ठरली.
आमदार पवार यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे स्वागत करुन ताकद दिल्याने नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आली. यामुळे मात्र भाजप सह माजीमंत्री राम शिंदे यांची अवस्था तेलही गेले अन तूपही गेले अशी झाली आहे.
नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तोन वर्षे भाजपशी जुळवून घेत, अखेरच्या सहा महिन्यात भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली आहे.
या बदलासाठी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बळ दिल्याने नगराध्यक्ष निखिल घायतडक व त्या दहा नगरसेवकांनी अचानक आमदार सुरेश धस व माजीमंत्री राम शिंदे यांना चकवा देऊन थेट आमदार रोहित पवार यांच्यायरोबर जुळवून घेऊन पद टिकवले.
यामुळे राष्ट्रवादीला आता आयती चालून आली आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसलेल्या जामखेड नगरपरिषदेमध्ये तीन वेळा राजकिय भूकंप झाले.
घायतडक यांनी नगराध्यक्षपद चांगले सांभाळले तसेच घायतडक यांचे पक्षात चांगले वजन असताना राम शिंदे त्यांनी नगराध्य बदलण्याचा निर्णय घेतला, मात्र घायतडक व इतर दहा नगरसेवकांना हा निर्णय आवडला नाही.
नगराध्यक्ष घायतडक यांचे पद टिकविण्याचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्यांनी थेट आ.रोहित पवार यांच्याबरोबर जुळऊन घेत. दहा नगरसेवकांसह प्रवेश करण्याची घोषणा करून नगराध्यक्ष बदलाची हवाच काढून घेतली. यामुळे मात्र भाजपाची अवस्था बिकट झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews