अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात साडे तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. या विकासकामांचा वेग यापुढे कमी होता कामा नये.
जे ठेकेदार विकासकामे करताना कामाची गुणवत्ता ठेवत नाही व घेतलेली विकासकामे वेळेत पूर्ण करीत नाही, अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले.
तहसील कार्यालयाच्या पंचायत समिती हॉलमध्ये जनता दरबार ते बोलत होते. यावेळी विलास खोंड, रावसाहेब टेके, हरी दवंगे, संजय जाधव, सुधाकर होन, छगन देवकर, नानासाहेब नेहे, सचिन वाबळे,
बाळासाहेब ढोमसे आदींनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,
कारभारी आगवन, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, पं. स. सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved