काँग्रेसचा नगरमध्ये रस्ता रोको

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी रस्त्यामध्येच अडवले. तसेच पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली.

याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. ‘ याच पार्श्ववभूमीवर नगर मध्ये देखील योगी सरकारचा निषेध करण्यात आला. याबाबत माहिती अशी कि,

शहर जिल्हा काँग्रेसतर्फे उत्तरप्रदेश सरकारने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या समवेत केलेल्या गैरवर्तणुकीबाबत तीव्र निषेध करून नगरमध्ये रस्ता रोको करण्यात आला.

रस्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. दरम्यान शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिप चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आजू शेख, सोनू शेख, मोबीन शेख, गणेश आपरे, शरीफ सय्यद यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रस्ता रोको करण्यात आले. मोदी सरकार आणि योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24