अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये एकच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यामध्ये 81 युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अविनाश घुले, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, संपत बारस्कर, अमोल गाडे, सुनील त्रिंबके, विजय गव्हाळे, प्रा.माणिक विधाते, रेशमा आठरे,
अंजली आव्हाड, साधनाताई बोरुडे, साहेबान जाहागीरदार, सुमित कुलकर्णी, गजेंद्र भांडवलकर, निलेश बांगरे, विपुल वाखुरे, दिपक खेडकर, ऋषिकेश ताठे, रुपेश चोपडा, नितीन लिगडे, गजेंद्र दांगट, राजू कोकणे, राम पिंपळे, संजू खताडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला. हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. प्रत्येक समाजातील युवकांनी सामाजिक जाणीव ठेऊन रक्तदान करण्याची गरज आहे.
कोरोना काळाच्या टाळेबंदीत ज्यावेळेस नागरिकांना घराच्या बाहेर निघायला बंदी होती. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा रुग्णालयात जाऊन स्वयंफुर्तीने रक्तदान केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी घेतलेला सामाजिक कार्याचे कौतुक करुन युवकांना रक्तदानाचे आवाहन केले.