अहमदनगर बातम्या

निळवंडेचे पाणी प्राधान्याने वंचित भागाला द्यावे : दिघे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरण प्रकल्पात पाणी सोडण्यापूर्वी निळवंडे धरणाचे पाणी प्राधान्याने लाभक्षेत्रातील वंचित भागाला देण्यात यावे, अशी मागणी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबुराव दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडले जाते, मात्र निळवंडे धरण लाभक्षेत्रातील दुष्काळ पिडीत भागाला अद्याप निळवंडे धरणाचे पाणी मिळाले नसताना मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिला आहे, ते कितपत योग्य आहे.

भंडारदरा आणि मुळा धरणाचे लाभार्थी जर सदर धरणातील पाण्यावर केवळ आपलाच हक्क सांगत असतील आणि निळवंडे धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडावे, अशी अपेक्षा ठेवत असतील, तर वर्षानुवर्ष पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निळवंडे लाभक्षेत्रातील शेतीला पाणी कसे मिळेल? असा सवालही तात्यासाहेब दिघे यांनी उपस्थित केला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरण प्रकल्पात पाणी सोडण्यापूर्वी निळवंडे धरणाचे पाणी प्राधान्याने लाभक्षेत्रातील वंचित भागाला देण्यात यावे, अशी मागणीही माजी सरपंच तात्यासाहेब दिघे यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office