अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राहुरी | तालुक्यात एकाचा दगडाच्या खाणीतील पाण्यात बुडून, तर दुसऱ्याचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनांबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पहिली घटना तालुक्यातील गडदे आखाडा शिवारात घडली. राहुल सुभाष पवार (वय २६, रा. खंडाळा, ता. वैजापूर, हल्ली राहुरी) याचा मृतदेह दुपारी गडदे आखाडा येथील दगडखाणीत आढळून आला.
गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेबाबत चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुसरी घटना तालुक्यातील कोळेवाडी येथे घडली.
कोळेवाडीतील शेततळ्यात आनंद यशवंत आंबेकर, (वय ७५) वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेबाबत मुकुंदा आंबेकर यांच्या फिर्यादीवरून अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल टेमकरे करीत आहेत.