रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना एमआयडीसीतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ घडली. स्वप्निल राजेंद्र झगडे यांनी फिर्याद दाखल केली.

त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ॲम्ब्युलन्स (क्र.एमएच ०४, एच ८६४) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी झगडे व त्यांचे मित्र शुभम रघुनाथ पाटील हे किरण धोत्रे यांच्या टिव्हीएस कंपनीच्या मोटारसायकलवरुन MIDC मधील कंपनीकडे जात होते.

या दरम्यान भरधाव वेगातील ॲम्ब्युलन्स कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. विशेष म्हणजे ॲम्ब्युलन्सचालक घटनास्थळावरुन पसार झाला. पुढील तपास दाताळ हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24