अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव शिवारात भरधाव वेगातील स्विफ्ट कारने जोराची धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले आहेत.
मच्छिंद्र नारायण वाळके व त्याचा साथीदार जखमी झाला आहे. मच्छिंद्र वाळके यांच्या फिर्यादीनुसार गणेश अरुण काळे याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मच्छिंद्र वाळके व त्यांचे साथीदार मोटारसायकलवरुन बेलवंडीकडे जात असताना स्विफ्ट कार (क्र.एमएच १६, बीझेड ७२०६) चालकाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला.
अपघातात दोघे जखमी झाले असून, मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. दरम्यान याप्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ. बडे हे करत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे तर अनेकजण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले आहे.