अहमदनगर बातम्या

शेवगाव व पाथर्डी दोन्ही तालुक्यात कधीही भेदभाव न करता समान निधी दिला : आ. राजळे

Published by
Ahmednagarlive24 Office

गेली १० वर्षापासून आमदार असताना मी कधीही भेदभाव न करता शेवगाव व पाथर्डी या दोन्ही ही तालुक्यात विकासाची समान कामे करण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला असून, मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल, तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले आहे.

शेवगाव तालुक्यातील मुंगी, दहिगाव शे, बोधेगावसह सोनविहीर ते कांबी या मार्गाच्या कामासाठी १३ कोटी ६० लाख रुपये निधीच्या विविध कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार राजळे यांचे हस्ते झाला असून, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मतदारसंघात शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून मोठा भरीव निधी उपलब्ध झाल्याने मतदार संघातही विकासकामाचा अनुशेष भरून निघाला असून, जी विकासाची कामे बाकी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मला तुमची साथ हवी असून, मला तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी मदत केली तर मतदारसंघाचा पूर्ण विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे राजळे यावेळी म्हणाल्या.

थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पार पडत असल्याने विरोधक फक्त निवडणुकीसाठी बाहेर पडले असून, कोणी शिवारफेरी तर कुणी जनसंवाद परिवर्तन यात्रा काढून तुम्हाला भुलवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र तुम्ही अशा भुलथापांना बळी पडू नका.

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना व पुरुषांसाठी लाडका भाऊ योजना तसेच बेरोजगार तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन या योजनेपासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहनही आमदार राजळे यांनी केले.

यावेळी मुंगीत शिवाजी समिंदर, श्रीरंग गोडें, भाजपचे माजी तालुका प्रमुख बापूसाहेब पाटेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी भीमराज सागडे, पांडुरंग तहकीक, अशोक तानवडे, शरद चाबूकस्वार, कडुभाऊ वडघणे, सुरेश नेमाने, सर्जेराव कारंडे, सुनिल वडघणे, नारायण पाखरे, मोहन डमाळे, कुडूस पठाण पांडुरंग मिसाळ, नुसरत शेख, दादा देवढे, बाजीराव लेंडाळ, रामा साबळे, उमाजी राजेभोसले, नितीन जाधव, विजयाताई मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बोधेगाव येथे रामजी केसभट यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कासमभाई शेख, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, हरिभाऊ झुंबड, राजेंद्र डमाळे, संदीप देशमुख, बद्री चेडे, प्रकाश मार्कंडे, नारायण मडके, सोमनाथ मडके, योगेश गर्जे, मयूर हुंडेकरी, अविनाश राजळे, सा.बा.चे उपअभियंता प्रल्हाद पाठक, निलेश साबळे,

रामेश्वर राठोड, ठेकेदार बाळासाहेब मुरदारे, संदीप भगत, मधुकर काशिद संदीप काशिद, हनुमान गावंडे, बबनराव घोरतळे, अशोक बानाईत, लक्ष्मण काळे, प.ल.तांबे, रामेश्वर तांबे यांचेसह इतरही ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office