Ahmednagar News : नवरा बायकोच्या वादातून मुलींचा ताबा देण्याच्या कारणावरून आपापसात वाद व भांडण करून पोलीस ठाण्यासमोरच शिवीगाळ करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, की दिनांक ११ रोजी नवरा बायकोच्या वादावरून व मुलींचा ताबा देण्याच्या कारणासाठी सोनई पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्याच्या आवारातच आपापसात झोंबा झोंबी व शिवीगाळ झाली.
यावरून सोनई पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मोहन पवार यांच्या फिर्यादीवरून निलेश ज्ञानेश्वर घुले, संतोष शिवाजी मोडवे, गोरख निवृत्ती खामकर, संतोष जनार्दन कुमठेकर, गोरक्षनाथ जनार्दन कुमठेकर यांच्यासह तीन महिलांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल आर आर लबडे करत आहेत.