लाचखोरी सुरूच ! महिला कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचे प्रकरणे समोर येत आहे.

यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. अशाच एका सरकारी महिला कर्मचाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

जमिनीच्या फेरफार प्रकरणात निकालाची प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्विकारताना एका महिला कर्मचाऱ्यास पकडण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वर्ग 3 लघुलेखक शैला राजेंद्र झांबरे (रा. दुर्वांकुर, नित्यसेवा सोसायटी, सावेडी, अहमदनगर) यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दि.17 डिसेंबर रोजी ही कारवाई केली. तक्रारदार याने निकालाच्या आदेशाची प्रत मिळण्याकरिता अर्ज केला होता.

त्यावर झांबरे यांनी दि.16 डिसेंबर 2020 रोजी दहा हजारांची मागणी करून त्यातील 4 हजार रुपयांची रक्कम स्विकारली. तसेच उर्वरित रक्कम आदेशाची प्रत देताना देण्यास सांगितले.

त्यानुसार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. श्रीगोंदा तहसील कार्यालयातच झांबरे यांना लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. एसीबी नगरचे पोलिस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकानं ही कारवाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24