अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-नगर शहरात औरंगाबाद रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अनिल गायकवाड, रा. निर्मलनगर याचे पैशाच्या कारणावरुन आरोपी गणेश चौरे याच्याशी बाचाबाची सुरू होती.
तेव्हा आई सोनाबाई शंकर गायकवाड, रा.निर्मलनगर या भांडण सोडविण्यासाठी गेल्या होत्या. येथे त्यांचा पुतण्याही आला होता.
तेव्हा आरोपी गणेश चौरे याने पुतण्या काळू बाबाला जाधव, रा. निर्मलनगर याच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन डोके फोडले तसेच महिलेस शिवीगाळ करून तुम्ही येथे आला तर तुमचे तंगडे तोडतो, अशी धमकी दिली.
दरम्यान सोनाबाई गायकवाड या महिलेच्या फिर्यादीवरून गणेश चौरे याच्याविरुद्ध भिंगार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोना जगताप हे पुढील तपास करीत आहेत.