अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा ! भावाने केले संतापजनक कृत्य…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील पळसुंदे येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली.

यातील आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे यातील अल्पवयीन पीडिता आरोपीची चुलत बहिण आहे.

चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यातील अल्पवयीन पीडितेचे वय १७ वर्षे पूर्ण आहे. घटनेनंतर पीडित मुलीने अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांकडून अल्पावधीतच आरोपीस पकडण्यात आले.

गुरुवारी (२ डिसेंबर) दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास पीडिता पळसुंदे गावातूनच घराकडे जात असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या २१ वर्षीय चुलत भावाने पीडितेस मिठी मारली. तिला पाऊलवाटेने ओढ्याकडे एका झाडाजवळ ओढत नेले व तिच्यावर अत्याचार केले.

यानंतरही याबाबत तू जर घरी कोणाला काही सांगितलेच, तर तुला मी सोडणार नाही, अशी धमकी दिली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अकोले पोलिस ठाण्यात बालिकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम ४, ६, ८, १२, १८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Ahmednagarlive24 Office